Team My Pune City – मालकाच्या खुर्चीवर बसल्याच्या(Chikhali Crime News) कारणावरून मालकाच्या भावाने कामगारावर कात्रीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना तळवडेतील अभिषेक इंटरप्रायजेस या कंपनीत बुधवारी (दि. 10) सायंकाळी 6 वाजता येथे घडली.
Girish Prabhune : गिरीश प्रभुणे यांना समाजसेवेत ईश्वर दिसला – भैय्याजी जोशी
राजू नामेदव सोनटक्के (वय 34, रा. टॉवर लाईन, मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. निरज हुशार सिंग (वय 18, रा. पाचोली, आग्रा, सध्या रा. अभिषेक इंटरप्रायजेस, तळवडे) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव (Chikhali Crime News)आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला सुट्टी असल्याने कामगार नीरज हा मालकाच्या खूर्चीवर बसून मोबाईल पाहात होता. त्यावेळी मालकाचा भाऊ आरोपी सोनटक्के हा कंपनीत आला. त्याने नीरज याला खूर्चीवर बसलेले पाहिले असता त्याने तू मालकाच्या खुर्चीवर का बसलास? असे म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील कात्रीने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत (Chikhali Crime News) आहेत.