Team My Pune City – किरकोळ कारणावरून रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना महाळुंगे गावाच्या हद्दीत अतिथी हॉटेलजवळ घडली असून या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
गणपत दामोदर कदम (वय 57), हे फिर्यादी असून ते रिक्षा चालक आहेत. त्यांनी तक्रार दिल्यानुसार शुक्रवार (दि.11), सकाळी सव्वा आठ च्या सुमारास, ते स्वतःची काळी-पिवळी पॅसेंजर रिक्षा (एमएच 12 व्हीव्हीयू 7067) घेऊन हुंदाई चौकातून एचपी चौकाकडे जात होते. दरम्यान, एक पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी अचानक जोरात यू-टर्न घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी अतिथी हॉटेलजवळ त्या वाहनचालकास जाब विचारला. मात्र त्याने हसत टाळाटाळ केली आणि शिवीगाळ सुरू केली.
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
Nigdi: जैन संतांचा चातुर्मास प्रवेश, ‘धर्मवृष्टी’ उपक्रमाने शहरात आध्यात्मिक उत्साह
सदोष वर्तन पाहून फिर्यादीने एक चापट दिली असता, आरोपी शशांक नरेंद्रकुमार शुक्ला (वय 22) याने गाडीमधून लोखंडी रॉड काढून, फिर्यादीच्या डोक्यावर दोन वेळा आणि हातावर एकदा असे तीन वेळा जोरात वार केले. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्यात 15 टाके पडले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.