Team My Pune City – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ( PCMC School) सहा इंग्रजी माध्यम शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’कडे खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच या निविदा प्रक्रियेत झालेल्या संगनमताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात भापकर यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहा शाळा — श्रीमती अनुसया नामदेव वाघेरे शाळा (पिंपरी), छत्रपती शाहू महाराज शाळा (कासारवाडी), कै. दत्तोबा काळे शाळा (काळेवाडी), बोपखेल, मोशी व दिघी येथील महापालिका शाळा — या ‘आकांक्षा फाउंडेशन’ या संस्थेला पाच वर्षांकरिता चालविण्यास दिल्या जाणार आहेत. यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त शेखर सिंह यांनी तब्बल 40 कोटी 53 लाख 75 हजार रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
‘आकांक्षा फाउंडेशन’ने मागील अकरा वर्षांपासून काही महापालिका शाळा( PCMC School) सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून प्रायोगिक तत्त्वावर चालविल्या होत्या. यामध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, संस्थेने पुढे सीएसआर निधी मिळवणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर आता महापालिकेच्या तिजोरीतून या शाळांसाठी निधी दिला जाणार आहे.
Talegaon Dabhade : चिमुकल्यांची विठ्ठलवारी तळेगाव बाजारपेठेत दिमाखात पार पडली
मारुती भापकर यांनी निवेदनात गंभीर आरोप केला आहे की, या निविदा प्रक्रियेत दोन आमदार आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्यात संगनमत झाले. एक विशिष्ट संस्था पात्र ठरेल यासाठी अटी-शर्ती ठरवण्यात आल्या आणि इतर कोणालाही निविदा भरण्याची संधीच देण्यात आली नाही. यामुळेच तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही आकांक्षा फाउंडेशनचीच एकमेव निविदा प्राप्त झाली आणि तीच पात्र घोषित झाली.( PCMC School)मारुती भापकर यांनी निवेदनात गंभीर आरोप केला आहे की, या निविदा प्रक्रियेत दोन आमदार आणि आकांक्षा फाउंडेशन यांच्यात संगनमत झाले. एक विशिष्ट संस्था पात्र ठरेल यासाठी अटी-शर्ती ठरवण्यात आल्या आणि इतर कोणालाही निविदा भरण्याची संधीच देण्यात आली नाही. यामुळेच तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही आकांक्षा फाउंडेशनचीच एकमेव निविदा प्राप्त झाली आणि तीच पात्र घोषित झाली.
यामध्ये एका आमदाराच्या निकटवर्तीयांची सहभागाची इच्छा असूनही निविदा प्रक्रिया अशा पद्धतीने राबविण्यात आली की कोणतीही स्पर्धा राहिली नाही. परिणामी एका संस्थेला पाच वर्षांसाठी सरळ 40 कोटींपेक्षा अधिक निधी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला ( PCMC School)आहे.
या सहा शाळांमध्ये 3 हजार 450 विद्यार्थी असून, सुरुवातीला प्रति विद्यार्थी खर्च 47 हजार रुपये गृहित धरण्यात आला होता. त्यानुसार 82 कोटींची निविदा काढण्यात आली. मात्र, आकांक्षा फाउंडेशनने पुढे दर कमी करत 23 हजार 500रुपये प्रति विद्यार्थी खर्च दर्शविला ( PCMC School)आणि 40 कोटींची अंतिम निविदा मंजूर झाली.
या प्रकारामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता असून, या निविदा प्रक्रियेमागे राजकीय हस्तक्षेप आणि संगनमत आहे, असा आरोप करत भापकर यांनी या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या निर्णयामुळे शाळांचे खासगीकरण होऊन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, हे खासगीकरण तात्काळ थांबवावे आणि महापालिकेनेच या शाळा चालवाव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली ( PCMC School) आहे.