situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Khadki Cantonment : खडकी कॅन्टोन्मेंटचा पुणे महापालिकेत होणार समावेश, तीन महिन्यांत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार

Published On:
 Khadki Cantonment

Team My Pune City – पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील नागरी भाग पुणे महापालिकेत विलीन होणार असून राज्य सरकारने या विलीनीकरणास ( Khadki Cantonment) तत्त्वतः मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. लष्कराच्या अधिपत्याखालील भाग वगळून फक्त नागरी वसाहती महापालिकेत समाविष्ट होतील असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

SPG International Public School : एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

काय होणार आहे विलीनीकरणामुळे? ( Khadki Cantonment)

पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ ५१८.७७ चौ.कि.मी. वरून ५२०.४२ चौ.कि.मी. इतके वाढणार.

पुणे कॅन्टोन्मेंटमधील २४६ एकर, तर खडकी कॅन्टोन्मेंटमधील १६२ एकर नागरी भागाचा समावेश.

दोन्ही क्षेत्रांची मिळून सुमारे १.६५ चौ.कि.मी. जमीन महापालिकेत येणार.

लोकसंख्या वाढ – पुणे कॅन्टोन्मेंट: ७१,७८१, खडकी: ७०,३९९.

नगरसेवकांची संख्या दोनने वाढून एकूण १६७, तर प्रभाग संख्या ४३ होण्याची शक्यता.

महत्वाची पार्श्वभूमी व पाठपुरावा

दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी संसदेत कॅन्टोन्मेंटमधील नागरी समस्यांचा मुद्दा मांडला होता.सध्या आमदार सुनील कांबळे यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्र सरकारने विलीनीकरण आपल्या अजेंड्यावर घेतल्यामुळे ही प्रक्रिया शक्य ( Khadki Cantonment) झाली.

आघाडीवर असलेले मुद्दे

कॅन्टोन्मेंट क्षेत्रात सुरक्षिततेमुळे अतिरिक्त एफएसआय मर्यादित. त्यामुळे भविष्यात बांधकाम विकासात अडथळा येण्याची शक्यता आहे. तसेच लष्कराच्या मालकीची जमीन महापालिकेच्या नावे होणार का, यावर अंतिम निर्णय केंद्र सरकारकडून अपेक्षित आहे.

Talegaon Dabhade : चिमुकल्यांची विठ्ठलवारी तळेगाव बाजारपेठेत दिमाखात पार पडली

पुणे महापालिकेने दोन्ही बोर्डांना पाणीपुरवठा केला आहे, मात्र 75 कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे.कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय, सेवा अटी वेगळ्या असल्याने व्यवस्थापनात अडचणी येऊ शकतात.

निवडणुकीवर परिणाम?

पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम सुरु आहे.

कॅन्टोन्मेंटची अधिसूचना निवडणूक आधी आली, तर संपूर्ण रचना बदलू शकते तसेचअधिसूचना उशिरा आली, तर त्या भागांसाठी स्वतंत्र निवडणुकीची शक्यता असल्याचे बोलले जात ( Khadki Cantonment) आहे.

Follow Us On