Team My pune city – गुरु पौर्णिमा दिनानिमित्त एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिकस्कूलमध्ये काल अध्यक्ष पांडुरंग नाना गवळी आणि सुनीता माई गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे संचालक नितीन लोणारी , मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, उपमुख्यद्यापिका नेहा खांडेकर यांनी कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती (SPG International Public School)पूजनाने केली.
Hinjawadi IT Park : ‘हिंजवडी आयटी पार्क’’साठी मुख्यमंत्र्यांकडे “व्हिजन”
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विषद केले. त्यांनी सांगितले की, गुरुजनांमुळेच आपल्याला ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे आपले जीवन प्रकाशमय होते. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यात गुरु-शिष्य परंपरा दर्शवणारे नाट्य आणि भक्तीगीते यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी गुरुजनांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, गुरुजनांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, गुरुजनांचा आदर करणे, त्यांच्या शिकवणींचे पालन करणे आणि त्याआधारे आपले जीवन घडवणे, हेच गुरुदक्षिणा (SPG International Public School) आहे.
Vadgaon Maval : विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
गुरुपौर्णिमा उत्सव शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. या उत्सवाद्वारे, गुरु-शिष्य नात्याची भावना अधिक दृढ झाली आणि गुरुजनांप्रती आदर व्यक्त ( SPG International Public School) करण्याची संधी मिळाली.