Team My pune city –काल पासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे.परतीच्या प्रवासा वेळीच पंढरपूर येथे मेघराजांनी संतांच्या पालखी सोहळ्यावर मेघराजांचा वर्षाव झाला.यामुळे भाविकांचा आनंद द्विगणित झाला.काल पंढरपूर येथून पालखी सोहळा वाखरी येथे मुक्कामी होता.
परतीचा प्रवास करत असताना संस्थान कमिटीने या वर्षी पासून परतीच्या वारीसाठी ३ उपक्रम सुरू केले आहेत.
Vadgaon Maval : विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
Jitendra Hole:”भारतीय संस्कृतीतून नैतिकतेचे संस्कार” – डॉ. जितेंद्र होले
१) रात्री दीड वाजता सर्व वारकऱ्यांना स्नानासाठी गरम पाणी देणे , चहा व गूड डे बिस्कीट चा प्रत्येकी एक पुडा देणे.
२) सोहोळ्यामागे एक टेम्पो ठेऊन जनरेटर वर मोठे लाइट्स लावले आहेत .जेणेकरून संपूर्ण सोहोळा रात्रीच्या वेळी सुद्धा प्रकाशात वाटचाल करेल.
३)दोन्ही वेळेस किमान एका वेळेस १००० वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था केली आहे.
याबाबत माहिती देवस्थान विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी दिली.

