Team My pune city –एसपीजी इंटरनेशनल पब्लिक स्कूलमध्ये दिनांक 18 जून रोजी पावन आणि पारंपरिक अशा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या उत्सवात भाग घेतला.
सकाळी ८ वाजता उत्सवाची सुरुवात झाली. सर्वप्रथम संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन पांडुरंग नाना गवळी, नितिन मधुकर लोणारी व स्वप्निल पांडुरंग गवळी यांच्या हस्ते करण्यात आले व आरती करण्यात आली.
MLA Babaji Kale : खेड ,चाकण, आळंदी अग्निशमन दल कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे – बाबाजी काळे
शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी घेऊन साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांनी अभंगगायन सादर करत वारकरी संप्रदायाचा अनुभव दिला. पालखी सोहळ्यासाठी शाळेतील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी, फलक सजावट, घोषवाक्य आणि पारंपरिक गीतांचे सादरीकरण केले. शाळेचे मुख्याध्यापक डॉ. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या भाषणात संतांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांनी त्या विचारांचे अनुकरण करावे असे आवाहन केले.शेवटी पालखीची मिरवणूक करण्यात आली व प्रसादाचे वाटप करण्यात आले आणि सोहळा आनंदात संपन्न झाला.
Vadgaon Maval : विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी