Team My Pune City – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा समाधानकारक पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये एकूण 70.05% पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 44% जास्त पाणीसाठा असल्याने पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना ( Pune Dam ) करावा लागणार नाही, अशी आशा आहे.
Pimpri Crime News : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांमध्ये यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. खडकवासला धरणात 55.55%, पानशेत धरणात 69.63%, वरसगाव धरणात 74.64% आणि टेमघर धरणात 63.09% पाणीसाठा आहे. एकूण 70.05% पाणीसाठ्यामुळे पुणे महानगरपालिकेला येत्या काही महिन्यांसाठी पाणीपुरवठा नियोजन करणे सोपे होणार आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये केवळ 26.43% पाणीसाठा होता, ज्यामुळे यंदाच्या आकडेवारीने प्रशासनाला( Pune Dam ) आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
PMRDA : PMRDA क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत
गेल्या वर्षी धरणांमधील पाण्याची पातळी चिंताजनक होती. 26.43% पाणीसाठ्यामुळे पाणी कपात आणि टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ पुणेकरांवर आली होती. यंदा मात्र 44% जास्त पाणीसाठ्यामुळे पाणीटंचाईची भीती कमी झाली आहे. जलसंपदा विभागाने यंदा पाण्याचे नियोजन आणि वितरण सुधारण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत, ज्यामुळे शहरातील प्रत्येक भागात पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा ( Pune Dam ) आहे.