Team My pune city – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा दि.१९ जून रोजी पार पडून त्यांनी आजोळ घरी प्रस्थान केले. दि.२० जून रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ ( Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ) झाला. तो दि.५जुलै पालखी पंढरपूर येथे दाखल झाला.
Dahiwale Crime News : दहिवलेमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाला टोळक्याकडून मारहाण
दि.६ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी सोहळा, श्रींची नगरप्रदक्षिणा, श्रींचे चंद्रभागा स्नान,आरती इ.झाले.दि.९ जुलै पर्यंत श्रींचा मुक्काम पंढरपूर येथे होता. आज दि.१० रोजी माऊलींचे चंद्रभागा स्नान झाले.श्रीकृष्ण नगरीत म्हणजेच गोपाळपुरात काल्याचा उत्सव पार पडला.तसेच आषाढी पौर्णिमेला संत व देव भेटीचा सोहळा पार ( Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ) पडला.
Lonavala Bus Accident : लोणावळ्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात एकाचा मृत्यू तर नऊ जण जखमी
तद्नंतर आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सोहळ्याचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पालखी सोहळ्याने आज आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला असून वाखरी येथे आज रात्री पालखी सोहळ्याचा मुक्काम ( Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ) असेल.
परतीचा प्रवास
दि.१० जुलै रोजी वाखरी मुक्कामी, दि.११ जुलै रोजी वेळापूर, दि.१२ जुलै रोजी नातेपुते, दि.१३ जुलै रोजी
फलटण,दि.१४ जुलै रोजी पाडेगाव,दि.१५ जुलै रोजी वाल्हे, दि.१६ जुलै रोजी सासवड ,दि.१७ जुलै रोजी हडपसर, दि.१८ ,१९ जुलै रोजी पुणे ,दि.२० जुलै रोजी आळंदीमध्ये पालखी सोहळा पोहचणार ( Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ) आहे.