Team My Pune City – शहरातील दारूवाला पुलाजवळ सुरू असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान एक लोखंडी खांब अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका शाळकरी मुलीच्या डोक्यावर खांब पडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू ( Mishap) आहेत.
Alandi : पंधरा दिवसांहून अधिक काळ बिबट्या एकाच परिसरात ; नागरिक भयभीत
ही घटना घडताच कसबा पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काम सुरू असताना योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी ठेकेदार आणि महापालिकेवर केला आहे. नागरिकांनी तत्काळ काम थांबवून जबाबदारांवर कारवाईची मागणी ( Mishap) केली आहे.
मुलीचे नाव अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, रुग्णालयातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिच्या डोक्याला आणि खांद्याला मार लागला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे; पण काळजीपूर्वक निरीक्षणाखाली ठेवण्यात आले ( Mishap) आहे.