Team My pune city – आळंदी ग्रामीण हद्दीत बिबट्याचा वावर वारंवार आढळून येत आहे. च -होली खुर्द आळंदी रस्ता स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या मागील बाजूस तसेच इंद्रायणी नदीच्या जवळील परिसरात थोरवे यांच्या ऊसाच्या शेतात,तेथील (Alandi) इतर परिसरात स्थानिक नागरिकांना तो दिसत आहे.
PCMC : ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना मिळणार ४ टक्के सवलत
तेथील शेतातील लिंबाच्या झाडावर व इतर दुसऱ्या झाडावर काहींना दिसत आहे.१६ जून च्या अगोदर पासून या परिसरात बिबट्या व त्याची पिल्ले आहेत. काल पुन्हा त्याच परिसरात बिबट्या आढळून आला.गेल्या काही दिवसां पासून त्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांची योग्य ती काळजी घेत बिबट्याला योग्य प्रकारे जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत (Alandi) आहे.
गजानन पालवे यांनी काल एका इमारतीच्या येथून व्हिडिओ चित्रीकरण केले. तेथील स्थानिक नागरिकांना वारंवार बिबट्या दिसत आहे. तसेच तेथील बांधकाम मजुरांना ही बिबट्या त्या परिसरात आढळून येत आहे.एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तेथून जात असताना तिला रस्त्यातून आडवा गेला असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. वनरक्षक यावेळी म्हणाले वरिष्ठ आधिकारी यांच्याशी चर्चा करून त्या परिसरात पिंजऱ्याचे नियोजन (Alandi) करू.