Team My Pune City — गुरूपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री क्षेत्र नारायणपूर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. भाविकांच्या प्रवासाची सोय व्हावी यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) कडून विशेष बससेवेचे (Shri Kshetra Narayanpur) आयोजन करण्यात आले आहे.
स्वारगेट बसस्थानकावरून 8 विशेष बस-
स्वारगेट येथून नारायणपूरकडे जाण्यासाठी एकूण 8 विशेष बसेस चालवण्यात येणार आहेत. या बसेस दर 30 मिनिटांच्या अंतराने उपलब्ध असतील.
बसमार्ग: स्वारगेट – मार्केटयार्ड – कोंढवा बु.।। – खडीमशीन चौक – बोपदेव घाट – चांबळी – सासवड – नारायणपूर
पहिली बस (स्वारगेट–नारायणपूर): सकाळी 6 वा.
शेवटची बस: सायंकाळी 6.30 वा.
पहिली बस (नारायणपूर–स्वारगेट): सकाळी 8 वा.
शेवटची बस: रात्री 8 .30 वा.
Lohagad: लोहगड आणि विसापूर किल्ल्यांना तारेच्या कंपाउंडचा वेढा, शिवप्रेमींमध्ये नाराजी
सासवड बसस्थानकावरून 5 विशेष बस- (Shri Kshetra Narayanpur)
सासवड येथून देखील 5 विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस दर 15 मिनिटांच्या अंतराने धावतील.
बसमार्ग: सासवड तहसिल कार्यालय – भोंगळे मळा – भिवडी – पोखरगाव फाटा – पुरंदर किल्ला पायथा फाटा – नारायणपूर
पहिली बस (सासवड–नारायणपूर): सकाळी 9.05वा.
शेवटची बस: सायंकाळी 5.55 वा.
पहिली बस (नारायणपूर–सासवड): सकाळी 8.30 वा.
शेवटची बस: रात्री 6.30 वा.
तरी पीएमपीएमएलने सर्व भाविक व भक्तांना या विशेष बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून गर्दी व वाहतुकीची समस्या टाळता येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले (Shri Kshetra Narayanpur) आहे.