Team My Pune City – निगडी ते खंडोबा माळ दरम्यानच्या मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात Pune Metroने (मनसे) पुकारलेले चक्का जाम आंदोलन मेट्रो प्रशासनाच्या तत्काळ कृतीमुळे स्थगित करण्यात आले ( Pune Metro ) आहे.
Girish Prabhune : पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा शनिवारी चिंचवड येथे अभिष्टचिंतन सोहळा
मनसेच्या शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर प्रकाश टाकत आंदोलना इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर मेट्रो प्रशासनाने पुढील 15 दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले ( Pune Metro ) आहे. त्यामुळे मनसेने आजचे नियोजित आंदोलन स्थगित केले आहे.
Rashi Bhavishya 10 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व राजु सावळे, जय सकट, रोहीत काळभोर व आकाश कांबळे यांनी ही आंदोलन पुकारले होते.
निगडी सिग्नल ते आकुर्डी खंडोबा माळ दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून,भक्ती शक्ती ते निगडी दरम्यान, श्रीकृष्ण मंदिराजवळ मेट्रो कामामुळे रस्ता खोदून तसाच ठेवण्यात आला आहे.या भागात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
मनसेच्या इशाऱ्यामुळे अखेर मेट्रो विभागाला जाग आली असून, त्यांनी तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे जाहीर केले ( Pune Metro ) आहे.