Team My pune city – अपघाताच्या खोट्या घटनेतून विमा कंपनीकडून भरपाई रक्कम मिळवण्यासाठी खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या चौघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खेड ( Chakan Crime News) तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
या प्रकरणात मृताच्या वारसांनी आणि इतर आरोपींनी संगनमताने खोटे साक्षीदार उभे करून पोलिसांची आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे .अशी माहिती मंचर पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आली आहे.
Chakan Highway : चाकण महामार्ग अडकले कोंडीत; नागरिकांतून तीव्र संताप
या प्रकरणात किरण सुरेश आवटे (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव), शिवाजी जिजाराम काळोखे (रा. कडूस, ता. खेड), नामदेव मारुती बोऱ्हाडे (रा. जऊळके खुर्द, ता. खेड), विठ्ठल विष्णू कदम (रा. एकलहरे, ता. आंबेगाव) या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमा कंपनीच्या अधिकार्यांनी या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल ( Chakan Crime News) केली होती.
Gahunje: डॉ. मीनल बोडके यांना सॅटेलाइट सिक्युरिटीमध्ये डॉक्टरेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरेश त्रिपती आवटे (रा. महाळुंगे पडवळ) हे दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन जखमी झाले होते. त्यानंतर उपचार घेत असताना ५ मार्च २०१९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मुलगा किरण आवटे याने ता. ३१ मार्च २०१९ रोजी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत अपघातास कंटेनर (एमएच १४ एफ टी ३६६६) जबाबदार असल्याचे नमूद केले. या तक्रारीच्या आधारावर कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल ( Chakan Crime News) करण्यात आला.
पुढील तपासात व विमा कंपनीच्या चौकशीत आढळून आले की, सदर अपघात कोणत्याही इतर वाहनामुळे नव्हता, तर मयत सुरेश आवटे यांचा दुचाकी घसरून पडल्यामुळे अपघात झाला होता. तरीही त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या साक्षीदारांच्या मदतीने खोटा दावा तयार करून आयसीआयसीआय लोमबार्ड जीआयसी लिमिटेड या विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत ( Chakan Crime News) आहेत .