Team My Pune City -नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून चौघांनी मिळून एका मुलाला धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (८ जुलै) सकाळी पिंपळे सौदागर येथे घडली.
सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाने वर्गातील मित्राला मोटू म्हणून चिडवले. याबाबत त्याने त्याच्या भावाला सांगितले. भाऊ चौघांना घेऊन आला आणि मोटू म्हणून चिढवणाऱ्या मुलाला धारदार शस्त्राने मारून जखमी केले.
Siddha Ganesh Dhol Pathak : श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोहळा व सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
PCMC:महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते पे ऍन्ड पार्क आणि व्हॉट्सऍप पार्किंग सुविधेचे उद्घाटन
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भांडण करणाऱ्या मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.