हप्ते न दिल्यास अपहरण व खुनाचा प्रयत्न करण्याचे प्रकार
Team My pune city – चाकण औद्योगिक परिसरात वेगवेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे परवाने घेऊन सुरू असल्यासारखी परिस्थिती आहे. अशा धंद्यांच्या अडून एक खूप मोठी इकोसिस्टीम कार्यान्वित आहे. असे धंदे (Chakan Crime News) चालवण्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते. याच अवैध धंदे चालकांकडून प्रशासनाच्या मूक संमतीने काही तथाकथित राजकीय पदाधिकारी, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते देखील प्रत्येक महिन्याला पैसे उकळत असल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत.
अंडा भुर्जीची गाडी चालवणाऱ्या व्यावसायिकाने हप्ता देण्यास उशीर केल्याने सहा जणांनी मिळून गाडीवर काम करणाऱ्या दोघांचे अपहरण करून कोरेगाव खुर्द ( ता.खेड ) येथील जंगलात नेऊन त्यांच्यावर खुनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे निरनिराळ्या धंदे चालकांकडून प्रत्येक महिन्याला होणारी वसुली आणि त्यावरून होणारे खुनाच्या प्रयत्नासारखे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर आंद्रा 92 टक्के
चाकण औद्योगीक भागातील अवैध धंद्यांच्या जीवावरती काही संघटनांचे पदाधिकारी म्हणून मिरवणारे कार्यकर्ते, त्यांच्या सोबतच्या महिला कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणावरती हप्ते वसुली करत असल्याची बाब समोर आली आहे. यामध्ये लॉजिंग, काही हॉटेल्स, गॅस रिफिलिंग, अवैध दारू विक्री, मटका, जुगार अशा अनेक धंद्याचा समावेश आहे. या ठिकाणांवरून संबंधित प्रशासनाला दर महिन्याला रकमात दिल्या जातातच, याशिवाय अशा धंद्यांच्या विरोधात पत्रे व आंदोलनाचे इशारे देणाऱ्या (Chakan Crime News) कार्यकर्त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते.
अशी रक्कम प्रशासनातील काही मंडळी आणि संबंधित व्यवसाय चालक यांच्याकडून दिली जाते. धक्कादायक म्हणजे चाकण औद्योगिक भागातून असे हप्ते घेणाऱ्यांमध्ये नेते म्हणून मिरवणारे काही गुंड, त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते, तसेच वेगवेगळ्या भागातून येणारे तब्बल 35 ते 40 कथित माध्यमातील प्रतिनिधी देखील अशी वसुली करण्यासाठी दर महिन्याला हजेरी लावतात. त्यामुळे हे सर्व अवैध धंदे काही जणांसाठी कमाईचा मोठा स्रोत झाले आहेत. अशी हप्ते वसूली करणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे.
त्यामुळे चाकण मधील अवैध धंदे काही जणांसाठी चरण्याचे खूप मोठे कुरण झाले आहे. असे धंदे सुरु ठेवण्यासाठी या सर्वाना सांभाळणे संबंधित यंत्रणेसाठी गरजेचे झाले आहे. अशा अवैध धंद्याच्या ठिकाणांहून पैसे न मिळाल्यास वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. आता ही अवैध धंद्यांची आणि त्यावर पोसलेल्या बोक्यांची सगळी इकोसिस्टीम कोण उध्वस्त करणार ? असा यक्ष प्रश्न निर्माण (Chakan Crime News) झाला आहे.