Team My pune city – शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळेच्या वर्धापन दिन सप्ताह ची सांगता करण्यात आली. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त न्यायाधीश जगदीश नारायणराव शानभाग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुटुंब प्रबोधन जिल्हा सहसंयोजक नारायणराव देशपांडे , शिक्षण प्रसारक मंडळाच्या नियमक मंडळ अध्यक्ष सोहनलालजी जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली.सर्व मान्यवरांचे सत्कार शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी यांनी अनंताचे रोप भेट देऊन केले.
शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी यांचा सत्कार शाळेच्या प्राचार्य पल्लवी शानभाग आणि सविता बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका हेमा रामराज यांनी केले.
Lonavala: छांगुर बाबाचे पुणे कनेक्शन, लोणावळा येथे १६ कोटींची मालमत्ता



शाळेचा यंदाचा 27 वा वर्धापन दिन असल्यामुळे गेल्या 27 वर्षातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बोलवून 27 नक्षत्र वृक्ष आणि तसेच मराठी माध्यम मधून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या 2008 ते 2025 या शैक्षणिक वर्षातील आलेल्या माजी विद्यार्थ्यांना शाळेने वर्धापन दिनाला आमंत्रित करून त्यांच्या प्रत्येक शैक्षणिक वर्षातील 18 पुराणांची नावे देऊन तुळशीची रोपे देऊन त्यांचे स्वागत केले व त्याचबरोबर भेटवस्तू देऊन प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना कापूर तुळस देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. आणि ती वृक्ष लागवड शाळेमध्ये करण्यात येणार आहे.त्याचबरोबर यंदाच्या वर्षी 10 वी मध्ये पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने पालकांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्याचाही बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जैन यांनी शिक्षक ही त्यागाची मूर्ती असून शिक्षकाची भूमिका ही आव्हानात्मक भूमिका आहे असे विचार व्यक्त केले.
PCMC:हिंजवडीसह सात गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीबाबत कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
दामोदर भंडारी यांनी पाककला स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व पालकांचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे नारायणराव देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने अनेक उपक्रम पुढे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे जस्टीस जगदीश शानभाग यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका अमृता करनेल यांनी केले पाहुण्यांचा परिचय ज्योती मोरे यांनी करून दिला. प्रार्थना, श्लोक शुभांगी डोंगरे आणि रमा जोशी यांनी म्हणले. सूत्रसंचालन विद्या दिघे यांनी केले. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.