Team My Pune City –पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना आज जाहीर करण्यात आली. १६५ नगरसेवकांसाठीच्या ४१ प्रभागांच्या प्रारूप रचनेत मोठ्या प्रमाणात हरकतीं आल्या असुन निवडणूक आयोगाने हरकतीचा विचार करून काही ठिकाणी बदल केले आहेत. काही (Pune)प्रभागांची नावे देखील बदल्याण्यात आली आहेत. यामुळे इच्छूकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडी याला जोडण्यात (Pune)आला आहे.प्रभाग क्रमांक २० बिबवेवाडी- महेश सोसायटी या प्रभागातील के. के. मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर-आंबेगाव- कात्रज या प्रभागाला जोडण्यात आला आहे.
Talegaon Dabhade: गोल्डन रोटरी तर्फे प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम
Uddhav Thackeray: शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही – उद्धव ठाकरे
प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुक-आंबेगावचा काही भाग देखील प्रभाग क्रमांक ३८ ला जोडण्यात आला आहे. कोळेवाडी, जांभूळवाडी हा भाग देखील याच प्रभागाला जोडण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक ३८ ला इतर प्रभागांतील काही भाग जोडल्याने हा प्रभाग अधिक मोठा झाला होता. त्यामुळे बालाजीनगर-आंबेगाव- कात्रजमधील सुखसागरनगरचा भाग कमी करून तो अंतिम प्रभागाच्या रचनेत प्रभाग ३९ अप्पर सुपर – इंदिरानगरला जोडण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडेसतरा नळीमधील थिटे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक ४ खराडी – वाघोलीला जोडला आहे. या प्रभागातून सर्वाधिक हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या होत्या.
महापालिकेच्या १६५ नगरसेवकांसाठीच्या ४१ प्रभागाच्या प्रारूप रचनेवर ५ हजार ९२२ हरकती, सूचना आल्या होत्या. यापैकी ४ हजार ५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या. १ हजार ३२९ हरकती, सूचना पूर्णतः आणि ६९ हरकती अंशतः मान्य करण्यात आल्या.
प्रभाग क्रमांक १, ४, १४, १५, १७, १८, २०, २४, २७, ३४, ३८ आणि ३९ मध्ये बदल झाले आहेत.