मुलांचा निकाल 95.47 तर मुलींचा निकाल 97. 77 टक्के
Team MyPuneCity – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12 वी च्या परीक्षेचा निकाल(12 th Result) सोमवारी (5 मे) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहराचा निकाल 96.55 टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलांचा 95.47 टक्के तर मुलींचा 97.77 टक्के निकला लागला. गेल्या वर्षी 94.64 टक्के निकाल लागला होता. यावर्षी निकालामध्ये वाढ झाली आहे.
Pimpri Chichwad Crime News 05 May 2025 : शेअर मार्केटच्या नावाखाली २० लाखांची फसवणूक
शहरामध्ये बारावीच्या एकूण 18 हजार 803 विद्यार्थ्यानी अर्ज भरले(12 th Result) होते. यामध्ये 9 हजार 979 मुले आणि 8 हजार 824 मुली होत्या. यापैकी 9 हजार 933 मुले आणि 8 हजार 792 मुलींनी परीक्षा दिली. यापैकी 18 हजार 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 9 हजार 484 मुले आणि 8 हजार 596 मुली उत्तीर्ण झाल्या. पिंपरी-चिंचवड शहरात २ हजार ३७४ विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले. प्रथम श्रेणी मध्ये ६ हजार ४२२, द्वितीय श्रेणीमध्ये ७ हजार ७३८ तर पास ग्रेड मध्ये १ हजार ५४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरात ६४५ विद्यार्थी फेल झाले. त्यांना परीक्षेची दुसरी संधी मिळणार आहे. शहरात ९२ ज्युनिअर कॉलेज आहेत. त्यातील २९ कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला.
Navin Samarth Junior College : नवीन समर्थ कॉलेजचा बारावी सायन्स विभागाचा यंदाही शंभर टक्के निकाल
१०० टक्के निकाल लागलेले ज्युनिअर कॉलेज (12 th Result)
आबासाहेब चिंचवडे ज्युनिअर कॉलेज, (12 th Result) अभिमान ज्युनिअर कॉलेज, के जे गुप्ता ज्युनिअर कॉलेज, मॉडर्न हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, निर्मल बेथानी हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, शिवभूमी विद्यालय सेंटर नंबर २१, डॉ. डी वाय पाटील ज्युनिअर कॉलेज, सेंट उर्सुला हायर सेकंडरी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, कमलनयन बजाज ज्युनिअर कॉलेज, सरस्वती इंग्लिश मिडीयम हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, सरस्वती विश्व विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज,
श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज, लिटल फ्लॉवर ज्युनिअर कॉलेज, सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय, विद्या व्हॅली नॉर्थ पॉईंट ज्युनिअर कॉलेज, नॉवेल ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, एस एन बी पी ज्युनिअर कॉलेज, ज्ञानज्योती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेज, इंग्लिश मिडीयम सेकंडरी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, सीएमएस इंग्लिश मिडीयम हायर सेकंडरी स्कुल, प्रियदर्शनी ज्युनिअर कॉलेज, एपीजे कॉलेज ऑफ सायन्स कॉमर्स, शिवभूमी इंग्लिश मिडीयम स्कुल, अभिषेक आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, धीरज ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स, पीसीएमसी आयटीआय फॉर गर्ल्स, गव्हर्नमेंट आयटीआय पीसीएमसी.