Team My Pune City : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये ( 12 th Exam) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची मुदत आता २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
Ayush Komkar Murder Case : आयुष कोमकर खून प्रकरणी बंडू आंदेकरसह १२ आरोपी येरवडा कारागृहात
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज भरण्यात अडचणी येऊ शकतात, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मंडळाला मार्गदर्शन केले होते. त्यानुसार मंडळाने हा ( 12 th Exam) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नियमित विद्यार्थी UDISE + मधील PEN-ID द्वारे आपल्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाईन अर्ज भरू शकतात. याशिवाय व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेत सहभागी होणारे तसेच तुरळक विषय आणि आयटीआय (Transfer of Credit) द्वारे परीक्षा देऊ इच्छिणारे विद्यार्थी यांचे अर्ज देखील महाविद्यालय प्रमुखांमार्फतच भरले जाणार आहेत. संबंधित अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर www.mahahsscboard.in येथे उपलब्ध ( 12 th Exam) आहेत.
तसेच फेब्रु-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज (फॉर्म क्र. १७) सादर करण्याची मुदत देखील १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
दरम्यान, दहावी व बारावी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्र मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ अशी आधी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता या मुदतीतही बदल करून प्रस्ताव सादर करण्यासाठी १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे मंडळाने स्पष्ट केले ( 12 th Exam) आहे.