Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक (10th Exam)व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इ.10 वी फेब्रु.-मार्च 2026 परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. 15 सप्टेंबर 2025 ते 6 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत.
कोण अर्ज भरतील?
नियमित विद्यार्थी : शाळेमार्फत UDISE + मधील PEN-ID वरून ऑनलाईन फॉर्म भरता येईल.
पुनर्परीक्षार्थी, खाजगी उमेदवार (Enrollment Certificate मिळालेले विद्यार्थी), श्रेणीसुधार योजना, तुरळक विषय घेणारे विद्यार्थी तसेच ITI (Transfer of Credit) घेणारे विद्यार्थी : मंडळाच्या संकेतस्थळावरून (www.mahahsscboard.in) ऑनलाईन अर्ज भरावा.

महत्त्वाचे नियम
शाळांनी परीक्षा शुल्क RTGS/NEFT द्वारे जमा करायचे आहे. शुल्क पावत्या आणि विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची तारीख मंडळ नंतर कळवेल.
फॉर्म भरण्यापूर्वी शाळेने आपली माहिती (School Profile – शाळेचे नाव, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक इ.) अचूक भरून ठेवणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनी भरलेली माहिती योग्य आहे का, हे शाळा तपासणार. यासाठी Pre-List दिली जाईल. विद्यार्थ्यांनी स्वतः पडताळून स्वाक्षरी करावी. मुख्याध्यापकांनीही शिक्का आणि स्वाक्षरी करून खात्री करणे बंधनकारक आहे.
Chakan: चाकण नगरपरिषद हद्दीतील १५० अतिक्रमणांवर हातोडा
Bapusaheb Bhonde Highschool : ॲड बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा
महत्त्वाची सूचना :
UDISE मध्ये नोंद नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरून फॉर्म सादर करता येईल.
खाजगी, पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व ITI विद्यार्थी यांची माहिती UDISE मध्ये नसल्याने त्यांना थेट ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागेल.
शिक्षण मंडळाने सर्व विद्यार्थ्यांना व शाळांना विनंती केली आहे की, दिलेल्या तारखांमध्येच अर्ज भरून प्रक्रिया पूर्ण करावी.