situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

10th – 12th Exam : इ. १०वी व १२वी खाजगी विद्यार्थ्यांसाठी फॉर्म क्रमांक १७ द्वारे नावनोंदणी प्रक्रिया सुरू, अंतिम तारीख ३१ ऑक्टोबरपर्यंत

Published On:

Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत इ. १०वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) (10th – 12th Exam)व इ. १२वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांची (Private Candidate) नावनोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. खाजगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्रमांक १७ भरून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थी कोणत्याही शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत मंडळाच्या नियम व अटींनुसार नावनोंदणी करू शकतात. यासंबंधी सर्व माहिती व मार्गदर्शक तत्त्वे मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Ajit Pawar: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असावी अशी आमची अपेक्षा -अजित पवार

Somatane Phata : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

खाजगी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी गुरुवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ पासून ते शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत अर्ज सादर करताना प्रत्येक विद्यार्थ्यास रु. १०० विलंब शुल्कासह अर्ज ऑनलाईन भरता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी पुढील कागदपत्रे तयार ठेवावीत –
१) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत किंवा द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र),
२) आधारकार्ड,
३) स्वतःचा पासपोर्ट आकाराचा छायाचित्र.
ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अर्जात अपलोड करणे आवश्यक आहे.

महत्वाचे म्हणजे, खाजगी विद्यार्थ्यांचे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचा ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) दिले जाईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मंडळाने निश्चित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्क भरून परीक्षेचे आवेदनपत्र (Examination Form) सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी छाननी पूर्ण झाल्यावर आपली मूळ कागदपत्रे संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाकडून परत घेण्याची दक्षता घ्यावी, असे मंडळाने कळविले आहे.

ही प्रक्रिया खाजगी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी असून, नियमित शिक्षणातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा १०वी व १२वीची परीक्षा देण्याचा मार्ग खुला झाला आहे.

Follow Us On