Team My Pune City – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) व इयत्ता 12वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्र. 17 भरून परीक्षेला बसण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंडळाने पुन्हा एकदा वाढविली आहे.
Komkar murder case : कोमकर खून प्रकरणातील चौघे गुजरात सीमेवरून अटक
या अनुषंगाने खाजगी विद्यार्थ्यांनी आपले नावनोंदणी अर्ज (फॉर्म क्र.17) ऑनलाईन पद्धतीने नियमित शुल्कासह भरावेत, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर मूळ अर्जाची प्रत, शुल्क भरल्याची ऑनलाईन पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती तसेच आवश्यक मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे.
Rashi Bhavishya 15 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या वाढीव तारखा (10th 12th Exam 2026)
मंगळवार दि. 16 सप्टेंबर 2025 ते मंगळवार दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या संकेतस्थळाला www.mahahsscboard.in भेट द्यावी. अर्ज भरण्याच्या सूचनाही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑफलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची मंडळाने स्पष्ट नोंद केली आहे.
अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत. यात –
१) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत / द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र)
२) आधारकार्ड
३) पासपोर्ट आकाराचा फोटो
ही कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करणे बंधनकारक आहे.
पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून (10th 12th Exam 2026) देण्यात येईल. मात्र, हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी मंडळाने जाहीर केलेल्या कालावधीत परीक्षेची आवेदनपत्रे व शुल्क भरून पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच, छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे परत घेऊन जाण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.