– हॉकी महाराष्ट्रकडून हॉकी इंडियाच्या ऐतिहासिक दिनाचे सेलिब्रेशन
Team My Pune City – भारतीय हॉकीच्या शतकमहोत्सवी ( 100 years of Indian hockey) सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हॉकी महाराष्ट्र आणि त्याच्या संलग्न युनिट्सने ७ नोव्हेंबर रोजी राज्यभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १९२५ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाशी (FIH) संलग्नता मिळवली होती. त्यानंतर भारतीय हॉकीने राष्ट्रीय अभिमानाचा नवा अध्याय लिहिला. या ऐतिहासिक क्षणाच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
Medha Kulkarni : प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासदार मेधा कुलकर्णी रुग्णालयात दाखल
या दिवशी राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन सामने खेळले जातील.( 100 years of Indian hockey) एकूण ७० सामने ‘लाइव्ह सबमिशन’ स्वरूपात सादर केले जाणार असून, शाळा, महाविद्यालये आणि क्लबस्तरावर हे सामने आयोजित केले जातील. या उपक्रमात ५९ पुरुष संघ आणि ४९ महिला संघ असे एकूण १,९३५ खेळाडू सहभागी होणार आहेत.
पुण्यातील सामने नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर( 100 years of Indian hockey) खेळले जातील. पुरुष विभागात क्रीडा प्रबोधिनी विरुद्ध पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) तर महिला विभागात क्रीडा प्रबोधिनी विरुद्ध पीएमसी मिश्र संघ असा सामना रंगणार आहे.
हॉकी महाराष्ट्राने या सोहळ्यात विविध उपक्रमांचाही समावेश केला आहे. त्यात अवेअरनेस इन पासिंग द बॉल, हॉकीविषयक चित्रपटाचे प्रदर्शन, स्किल्स चॅलेंज, हॉकी क्विझ, सायकल रॅली आणि खेळाडू व आश्रयदात्यांचा भव्य मार्च यांचा समावेश आहे.
हॉकी इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे यांनी या ( 100 years of Indian hockey) सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “भारतीय हॉकीची १०० वर्षे साजरी करण्याच्या इतिहासाचा भाग होण्याची ही एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्राने पुरुष आणि महिला मिळून सुमारे ४० ऑलिंपियन दिले आहेत. हा दिवस नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारा ठरो.”
भारतीय हॉकीचा गौरवशाली वारसा आणि महाराष्ट्रातील खेळाडूंचे योगदान अधोरेखित करत, या शतकमहोत्सवी सोहळ्यामुळे राज्यभरात हॉकीला नवी ऊर्जा मिळेल, अशी ( 100 years of Indian hockey) अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


















